मा. श्री. रिसबूड - लेख सूची

श्री. भाट्यांचे म्हणणे पटले नाही

श्री अनिलकुमार भाटे यांचा लेख,(आ. सु. जुलै १९९९) मला आवडला नाही व पटलाही नाही. श्री. दि. य. देशपांडे यांना तत्त्वज्ञानातले आणि अध्यात्मातले काही कळलेले नाही, आणि भाटे यांना खूप काही कळले आहे असे त्यांचे प्रतिपादन आहे. कर्मसिद्धान्तावद्दल भाटे यांनी असे म्हटले आहे:-कर्मसिद्धान्त हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे. ईश्वर माना किंवा न माना, हा सिद्धान्त अवाधित …

एका जुन्या वादाचा शेवट-फलज्योतिष : ग्रहांसहित आणि ग्रहांविरहितही; पण दोन्ही प्रकार भ्रामक!

फलज्योतिषाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारच्या फलज्योतिषातले ग्रह सुबुद्ध असतात व त्यांना फलज्योतिषाचे नियम ठाऊक असतात. दुसऱ्या प्रकारच्या फलज्योतिषाला आकाशातल्या ग्रहांची गरज नसते. ग्रहांची नावे तेवढी त्यात वापरलेली असतात! माझे हे विधान वाचकांना चमत्कारिक वाटेल, पण ते अक्षरशः खरे आहे हे मी सिद्ध करणार आहे. वादापुरती मान्य अशी गृहीतके (१) ग्रहांचे फलज्योतिषीय प्रभाव पृथ्वीच्या संपूर्ण …

वैज्ञानिक दृष्टिकोन

भौतिक विज्ञानामुळे जो निर्माण होतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन असा समज सार्वत्रिक आहे. भौतिक विज्ञान ज्यांना उपलब्ध झालेले आहे त्यांच्यात तो दृष्टिकोन निर्माण होतोच असे म्हणता येत नाही, आणि त्याच्या उलट ज्यांना भौतिक विज्ञानाचे रीतसर शिक्षण मिळालेले नाही, त्यांच्यात तो असल्याचे अनेक वेळा ध्यानांत येते. असे जर आहे तर हा वैज्ञानिक शब्द सोडून देऊन त्याऐवजी चिकित्सक …

ज्योतिषशास्त्र की वदतोव्याघात?

ज्या विषयाशी आपली धड तोंडओळखसुद्धा नाही त्या विषयावर टीका करणे योग्य नाही. परंतु मी असे अनेक बुद्धिप्रामाण्यवादी (किंवा विवेकवादी) लोक पाहिले आहेत जे अनेक प्रसंगी असे बोलून जातात की, ज्योतिषशास्त्रातले आम्हाला जरी काही कळत नसले तरी ते एक थोतांड आहे हे आम्हाला ठाऊक आहे. असे बोलणे विवेकवादी म्हणवणाऱ्यांना शोभत नाही. त्यांनी हा विषय निदान ढोबळ …

मनु घसरला आहेच

मनुस्मृतीवर टीका करणारी मंडळी मनुद्वेषाच्या विकृतीने पछाडलेली असल्यामुळे, मनूवर “सकारण व अकारण मनूला झोडपण्याचे पुरोगामी व्रत आचरीत असतात, असा आरोप श्री. जोशी यांनी केलेला आहे. या टीकाकारांना स्वतःला ग्रंथ समजण्याची क्षमता नसते असेही विधान ते करतात. (त्यांच्या लेखांतील शेवटचा परिच्छेद पाहावा.) मनूला “सकारण झोडपले तर त्याचा राग श्री जोशी यांना का यावा ते समजत नाही.“अकारण” …

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक, यांना स.न. वि मुस्लिम समाजाचे मन वळवण्यासाठी म. गांधींनी अनुसरलेला मार्गच आजही आवश्यक आहे अशी श्री. पळशीकरांची श्रद्धा आहे. ऑगस्ट १९९३ अंक, पृष्ठ १३७ वर त्यांनी काहीशा डौलाने प्रश्न विचारला आहे की, “सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळवण्याचे कोणते प्रयत्न झाले, त्या प्रयत्नांना अपयश का आले, व अपयशाची जबाबदारी …

शास्त्रीयतेची प्रतिष्ठा फलज्योतिषाला मिळणे अशक्य आहे

सुधारकच्या वाचकवर्गापैकी कुणीही फलज्योतिपावर विश्वास ठेवणारे असतील असे मला वाटत नाही. माझ्या या लेखाचा हेतू कुणाचा भ्रमनिरास करण्याचा नाही. माझा हेतू असा आहे की फलज्योतिषात ज्या अंगभूत (built-in) अंतर्विसंगती आहेत त्यांची ओळख वाचकांना व्हावी. फलज्योतिपावर आमचा विश्वास नाही ‘ असे म्हणणाऱ्यांना जर असा प्रश्न विचारला की, तुमचा विश्वास का नाही त्याची कारणे सांगाल का, तर …

बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये

पत्र पहिले भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी मांडलेले विचार व दुसरेही काही विचार कदाचित काही बुद्धिवादी मंडळींना पटणार नाहीत. माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपणे करू शकत नाही. निदान बुद्धिवादी …